check bank balance using Aadhar( uidai): आधार कार्ड हे आपल्या वर्तमान काळातील ओळख (identification) साठी सर्वात अत्यावश्यक पुरावा आहे. शैक्षणिक क्षेत्रात किंवा इतरही क्षेत्रात आधार अत्यावश्यक पुरावा मानला जातो.
भारत सरकार द्वारे भारतीय नागरिकांना आधार कार्ड हा महत्वाचा आवश्यक पुरावा दिला गेला आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (Unique Identification Authority of India ) द्वारा आधार मध्ये बारा अंकी संख्या असलेला नंबर आहे, त्याला आपण Aadhaar number असेही म्हणतो. हा आधार नंबर (Aadhar number) आपल्या मोबाईल, बँक खाते, आणि पॅन कार्ड ला लिंक असतो.
Check bank balance using Aadhar : आपली व्यक्तिगत माहिती जसे की पत्ता व जन्म तिथि आधार मध्ये दिलेली असते आणि आपली बायोमेट्रिक माहिती (biometric information) म्हणजेच आपल्या हाताची बोटांना स्कॅन करून निशान जोडलेली असतात.
आधार कार्ड बनवताना आपण जी माहिती भरतो त्याला आपण बदलू पण शकतो आणि आपण नाव व पत्ता सहज बदलू शकतो. त्यात दिलेल्या 12 अंकी संख्या ने आपण सहजच बँक बॅलन्स (Bank balance) चेक करू शकतो. आधार ने दिलेल्या या सुविधे मुळे बँकेत जायचं काम खूपच कमी झाले आहे.
यूआईडीएआई (Unique Identification Authority of India ) ही सुविधा म्हाताऱ्या बुद्ध लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे , की जे स्मार्टफोनच्या उपयोग करत नाहीत.
ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन नाही त्या ठिकाणी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे कारण याचा उपयोग करून आपण पैसे पाठवणे , सरकारच्या सबसिडी साठी अर्ज किंवा पॅन कार्ड आवेदन महत्त्वाचं आहे.
सध्याच्या शैक्षणिक काळात आधार हे खूपच महत्त्वाचं आहे त्याच्या उपयोग खूपच शैक्षणिक कामात होत असतो.
आधारचा उपयोग करून बँक बॅलन्स चेक कसे करावे जाणून घ्या;
स्मार्टफोनच्या उपयोग करून सुद्धा आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकतो , ज्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन नाहीये त्या ठिकाणी सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. या सुविधेचा लाभ कसा घ्यावा खालील प्रमाणे;
- आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर *99*99*1# डायल करा.
- 12 अंकी संख्या असलेला आधार नंबर टाकावा.
- पुन्हा एकदा आधार नंबर टाकून सत्यापित (confirm) करावे.
- यानंतर यूआयडीएआय (uidai) आपल्या स्क्रीनवर फ्लॅश SMS पाठवेल .
- स्क्रीनवर दिलेल्या फ्लॅश एसएमएस (SMS) मध्ये आपला बँक बॅलन्स दिसेल.
घरपोच घ्या आधार सेवा;
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ( Unique Identification Authority of India ) आपल्या मोबाईल नंबर ला आधार शी लिंक करणे किंवा इतर माहिती अपडेट करणे यासाठी घरपोच सेवा उपलब्ध करून देणार आहे .
आधार संबंधित कामासाठी आता आधार सेवा केंद्र ( Aadhaar Service Center )ला जायची गरज नाही.
Uidai यावेळी 48 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण (training) देत आहे , रिपोर्ट च्या आधारे एक पॉईंट पाच पोस्ट ऑफिसर्स यांना दोन भागात ट्रेनिंग दिली जात आहे,त्यामुळे लवकरच आधार सेवा घरपोच केली जाईल.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण च्या या सेवेमुळे म्हातारे वृद्ध लोकांना घरपोच सेवा देऊन खूपच मदत होईल.